चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भर संसदेत आक्षेपार्ह विधान करून त्यांचा घोर अपमान केला असून देशातील जनमानसाच्या भावना दुखावल्या आहेत. याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा तसेच देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याने तात्काळ प्रभावाने आपल्या स्तरावरुन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात आला.
. यावेळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गृहमंत्री शाह यांच्या त्या वक्तव्याचा जोरदार निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले.
. यावेळी केंद्र व राज्य सरकार च्या निष्क्रियतेमुळे देशात व राज्यात वाढता गुंडाराज, महिलांवरील अत्याचार, भाजपच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान, परभणीतील वडार समाजातील भीमसैनिक – सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू, बिड जिल्हातील मस्साजोग गाव चे सरपंच संतोष देशमुख हत्या, कल्याणमध्ये मराठी माणसावर गुंड पाठवून हल्ला या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. हे सरकार मंत्रिमंडळातील नेत्यांचा, पोलिसांचा बचाव करीत जनतेवर अन्याय करीत आहेत.
. यावेळी मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक जयस्वाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा. रमेशचंद्र दहिवडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, अनिरुद्ध वनकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, घनश्याम मुलचंदाणी, प्रवीण पडवेकर, नंदु नागरकर, चंदाताई वैरागडे, महिला अध्यक्षा सुनंदा ढोबे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, बेबीताई उइके, प्रशांत भारती, अरुण भेलके, करिमभाई, सोयल रजा शेख, प्रशांत दानव, संतोष लहामगे, प्रमोद बोरीकर, गोपाल अमृतकर, राजेश अडुर, इस्माईल शेख, अंकित रामटेके, अजय महाडोळे, रामकृष्ण कोंद्रा, मनिष तिवारी, वसंता देशमुख, शालिनी भगत, सुनीता अग्रवाल, सिमा वाघमारे, यासह जिल्ह्यातील काँग्रेस तथा महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


