सिंदेवाही तहसीलदार पानमंद यांची धडक कारवाई
सिंदेवाही : तालुक्यातील रेती तस्कर अनेक घाटातून अवैधपणे रेतीची मोठया प्रमाणावर राजरोसपणे तस्करी करीत असून, यावर वारंवार आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहे. परंतु मुजोर रेतीचोर मात्र प्रशासनाला न जुमानता रेती तस्करी करीत आहेत. त्यामुळें सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद यांनी धडक मोहीम राबवून रविवारी रात्री एका रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाही करून ट्रॅक्टर जप्त केला असल्याची माहिती तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली आहे.
. सिंदेवाही तालुका रेती साठी प्रसिद्ध असून या तालुक्यात अनेक रेतिघाट तयार झाले आहेत. मागील वर्षी पासून रेती घाटाचे लिलाव बंद असल्याने इमारत बांधकाम किंवा इतर बांधकाम करण्यासाठी लागणारी रेती अवैध मार्गाने काढणे सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या करोडो रुपयाला चुना लागत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील रेती तस्करी ही तालुका महसूल प्रशासनाला मोठे आव्हान ठरले आहे. रात्रीची रेती वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच २२ डिसेंबरचे मध्यरात्री तहसीलदार पानमंद यांनी गस्त करीत लाडबोरी परिसरात एक व्यक्ती अवैध्य रेती तस्करी करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर ट्रॅक्टर अडवून चौकशी केली असता ट्रॉलीमध्ये अवैध रेती भरलेली होती. MH-19 यु 5101 व पुन्हा एक ट्रॅक्टरच्या मुंडक्याचा नंबरप्लेटवर नंबर आहे, तर ट्रॉलीवर नंबर नाही. सदर वाहन ट्रॅक्टर – ट्राली
सिंदेवाही तहसील ला जमा केला. असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे रेती भरलेल्या ट्रॅक्टर वाहन मालकावर दंडात्मक कारवाई करावे असा प्रस्ताव पाठवीला आहे. अशी माहिती सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली. तहसीलदार पानमंद यांचे धडक कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


