Home सामाजिक नंदोरीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

नंदोरीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

6

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी (बु.) येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समितीच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणात आयोजित या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी आणि समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

.        या जयंती सोहळ्याचे उदघाटन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव आस्कर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन केली तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती भद्रावती चे माजी सभापती धनराज विरुटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपूरचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण ठेंगणे, ग्रामपंचायत नंदोरी बु. चे प्रशासक तथा माजी सरपंच मंगेश भोयर,  तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आशितोष घाटे,  दैनिक नवजीवन चंद्रपूरचे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, माजी उपसरपंच भानुदास ढवस, माजी सदस्य किशोर उमरे, देवराव आस्कर, तलाठी रवींद्र लोंढे, जि. प. शाळेचे शिक्षक लोंढे, महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेवराव आस्कर आणि जिल्हाध्यक्ष रमेश बुच्चे, भास्कर जिवतोडे, निळकंठ अवगान, रामकृष्ण मोंढे, रामभाऊ अवगान, नागोजी चामाटे, लता माहुरे, कमाल चामाटे व बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

.       यावेळी बोलताना मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकला. अहिल्यादेवींनी महिला सशक्तीकरण, जलव्यवस्थापन आणि समाज सुधारणेच्या क्षेत्रात केलेले कार्य आजही तितकेच प्रस्तुत असून, त्यांनी घडवलेला इतिहास भावी पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन वक्त्यांनी केले.

.        या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन स्नेहा सुखदेव आस्कर यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार सुहानी मारोती चामाटे व श्वेता बलदेव बिटे यांनी मानले. सोहळ्याच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा लाभ समाज बांधवांनी व गावकऱ्यांनी घेतला.

.        या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समितीचे पदाधिकारी आकाश मोंढे, राहुल अवगान, गौरव माहुरे, गौरव आस्कर, राकेश अवगान, सचिन अवगान, रवी काळे, महेंद्र येवले, सुभाष बुरांडे, नितेश बुरांडे, पुरुषोत्तम चामाटे यांच्यासह सर्व समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!