Home चंद्रपुर जिल्हा विशेष अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात

अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात

1264

शहर पोलिसांची कारवाई

४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

चंद्रपूर : शहरातील अनेक ठिकाणी घरफोड्या करणारा, तसेच पोलिस रेकार्डवरील अट्टल चोरट्यास शहर पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकून त्याच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आशिष ऊर्फ जल्लाद अक्रम शेख (२१), रा. फुकटनगर संविधान चौक असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

.      चंद्रपूर शहर परिसरात डी.एड. कॉलेजच्या मागे कांती चौक बाबूपेठ चंद्रपूर येथील रजनी गौतम जिवने यांनी शहर पोलिस स्टेशन गाठून २२ डिसेंबर रोजी त्यांच्या कुलूपबंद घरातून चार ग्रॅम सोन्याचे कानातले, दोन ग्रॅमचे सहा गहू मणी असा ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार केली. पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे फिरवून पोलिस रेकॉर्डवरील आशिष ऊर्फ जल्लाद अक्रम शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४२ हजार रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली.

.       ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात एपीआय बसाने, पीएसआय संदीप बच्छिरे, भावना रामटेके, सचिन बोरकर, संतोषकुमार कनकम, कपूरचंद खैरवार, इम्रान खान, राजेश चिताडे, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, इर्शाद खान, विकम मेश्राम आदींनी केली.

error: Content is protected !!