नेरी : आदिवासी गोंड गोवारी जमात संघटना मोटेगाव तर्फे 114 शहीद आदिवासी गोवारी बांधवांना श्रद्धांजली कार्यक्रम व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन मोटेगाव येथे दि 23 डिसेंबरला करण्यात आले होते मोट्या उत्साहात प्रबोधन मेळावा संपन्न झाला.
. मोटेगाव येथे ग्रामस्वछता करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली प्रथम संपुर्ण समाज बांधवांनी 114 शहीद आदिवासी गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली आणि समाज प्रबोधन मेळाव्याला सुरवात करण्यात आली समाज प्रबोधन मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून सुभाष नेवारे सरपंच मोटेगाव ,प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून चंदू रामटेके उपसरपंच मोटेगाव प्रदीप सुकारे राजेंद्र गाडे तमुस अध्यक्ष धनपाल खोब्रागडे , मनोहर मसराम वनिता घोडमारे दयाराम राऊत वंदना दांडेकर वामन नेवारे एकनाथ नेवारे गुरुदास नेवारे अनुप नेवारे तेजराम इंगुलकर श्रीकांत नेवारे संदीप नेवारे सचिन बांबोडे मान्यवर म्हणून उपस्थित होते यावेळी समाजातील शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विषयावर मार्गदर्शन केले तसेच समाजाची प्रगती कशी होईल आणि शासनाच्या योजना आणि समाजाला अनुसूचित जमाती च्या योजना मिळण्यात यावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगितले यानंतर सायंकाळी दीप प्रजवलीत करून संपूर्ण गावातून महिलांनी पारंपारिक वेशभूषा साकारीत दीप मिरवणूक काढली प्रत्येक महिलांनी हातात दीपक घेऊन मोठयाने घोषणा देत गावातील मुख्य मार्गानी मीरवणुक काढली या कार्यक्रमाला बहुसंख्य गोंड गोवारी आदिवासी समाज बांधव महिला भगिनी आबालवृद्ध व गावकरी उपस्थित होते यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.


