चिमूर तालुक्यात रेती तस्करीचा दुसरा बळी
रेती तस्करी च्या ट्रकटरवरून पडून तरुण युवकाचा दुर्दैवी मृत्यू
नेरी : रेती घाटातून रेती भरलेला ट्रॅक्टर चिखली गावालगत असलेल्या पुलावर आदळला. यात ट्रॅक्टर वर बसलेला मजूर खाली पडला. तो ट्रॅक्टर ट्रालीच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दि. 17 ला पहाटेच्या सुमारास घडली. लखन अंबादास पोइनकर (19) रा. शिवणपायली असे मृतक मजुराचे नाव आहे.
. चिमूर तालुक्यातील अवैद्य रेती तस्करांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्री 10 वाजता पासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत रेती तस्कर रेतीची तस्करी करताना दिसून येत आहे. मंगळवारी पहाटे च्या सुमारास शिवनपायली येथील नदी घाटावरून रेती भरून ट्रॅक्टर क्र एम एच 34 सी डी 9566 नेरीला येत असताना चिखली गावाजवळील पुलावर ट्रॅक्टर आदळले. यामुळे ट्रॅक्टर वर बसलेला मजूर लखन पोईनकर याचा तोल गेला. आणि अचानक खाली पडला व ट्रालीच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. रात्रभर रेतीची तस्करी सुरू असल्याने लखन याला झोप आली असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे त्याचे हात सुटले आणि तो खाली पडल्याची खमंग चर्चा परिसरात सुरू आहे. त्याला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रेताचे उत्तरणीय तपासणी करून शिवनपायली गावाला अंतिमसंस्कार करण्यासाठी आणण्यात आले. सदर घटनेतील ट्रॅक्टर हा शिवनपायली येथील सुमीत पालकदास बोरकर यांच्या मालकीचा असून चालक चंद्रशेखर नारायण तुमराम यांच्यावर भांदवी कलम 106/1, 281, 184 अंतर्गत पोलीस स्टेशन चिमूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
. रेती तस्करीत जीव गमावण्याची ही चिमूर तालुक्यातील दुसरी घटना होय. याअगोदर खडसंगी परिसरात ट्रॅक्टर वरून पडल्याने तरुणांचा बळी गेला होता मात्र एवढी मोठी घटना होऊन ही महसूल विभाग रेती तस्करीवर अंकुश लावू शकत नाही. ही मोठी शोकांतिका आहे त्यामुळे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेतीतस्कर पुन्हा किती बळी घेतील हे सांगता येत नाही तरुण युवकाचा बळी गेल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे सदर घटनेने पुन्हा एकदा रेती तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ,महसूल विभाग आणि पोलीस विभाग आता कोणती भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे? मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी तसेच ट्रॅक्टर जप्त करण्यात याचे अशी मागणी नागरिक करीत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजय चौधरी करीत आहेत.


