Home सामाजिक सिंदेवाहीत विविध धार्मिक कार्यक्रमाने दत्त जयंती साजरी

सिंदेवाहीत विविध धार्मिक कार्यक्रमाने दत्त जयंती साजरी

1304

सिंदेवाही : शहरातील नविन दत्त मंदिर येथे दि.१३ ते १५ डिसेंबर दरम्यान श्री दत्त जयंतीनिमित्त विधिवत पूजन, अभिषकांने, आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने भक्तिमय वातावरणात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली.

.      हिंदू पंचागानुसार असलेल्या मार्गाशिष पौर्णिमा या तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. दत्तात्रेयांनी दिनदलितांची सेवा, आणि समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे काम केले. त्यांच्या पश्चात श्रीपाद, श्रीवल्लभ, श्रीनृसिंह, सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती, हे त्यांचे अवतार मानल्या जाते. श्री दत्तच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने  वाचला जातो. नुकत्याच झालेल्या दत्त जयंती निमित्त सिंदेवाही येथील महिला मंडळाच्या वतीने भजन आरती व विविध कार्यक्रम सुरुवात करण्यात आली. १३ डिसेंबर रोजी माजी समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांचे हस्ते श्री दत्त मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले. १४ डिसेंबर शनिवारला श्री दत्त जयंती निमित्य शहरातून  श्री दत्तप्रभू पालखी व दिंडीचे  आयोजन करण्यात आले होते. १५ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात आला.

.       या सोहळ्याप्रसंगी  दत्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भोजराज बनसोड, सचिव भारत बारसाकडे, कोषाध्यक्ष कमलेश नागरे, जयंती उत्सव समितीचे आयोजक शेखर शेन्डे, बबन रामटेके, पोरस गेडाम, कुणाल बारसागडे, तानसेन रामटेके, भावेश रामटेके इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!