Home सामाजिक कराटे स्पर्धेसाठी जाण्यासाठी नाते आपुलकीचे संस्थेच्या सभासदांनी ५ हजार पाचशेची केली मदत

कराटे स्पर्धेसाठी जाण्यासाठी नाते आपुलकीचे संस्थेच्या सभासदांनी ५ हजार पाचशेची केली मदत

1248

चंद्रपूर : जिल्ह्यात छोटा बाजार चौकात राहणारा ११ वर्षीय तेजस माकोडे हा आपल्या शिक्षणासोबतच ३ वर्षा पासून कराटे चे प्रशिक्षण घेत होता. पण आईं बेकरी मध्यें काम करत असल्याने त्याला शिक्षणसोबत कराटे प्रशिक्षण देणे कठिण होते तरीही तेथील कराटे कोच नी त्याची मेहनत बघता मोफत प्रशिक्षण देण्याचे ठरवले. आणि त्यात तो तरबेज ही झाला. व मुंबई येथे स्पर्धेसाठी काहीं मुलांची निवड करण्यात आली. पण त्याच्या राहण्याची जाण्याची सोय नसल्याने मुल स्पर्धे पासून वंचित राहिले असते ही माहिती नाते आपुलकीचे संस्थेच्या सदस्य दिनेश जीवतोडे यांना माहिती होताच त्यांनी मुलाची व प्रशिक्षण देणाऱ्या कोच ची भेट घेउन पूर्ण शहानिशा केली. त्यांना पाच हजार रुपयांची गरज होती त्यामुळें काही शुल्लक पैश्या अभावी मुलांचे भवितव्य अंधारात राहिले असते म्हणून त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना कुठं संधी मिळावी यासाठी संस्थेच्या सभासादांसानोर माहिती टाकली.

.     आमच्या संस्थेच्या नियमात शिक्षण आणि आरोग्य हे मुख्य उद्देश असून ही मदत आमच्या संस्थेच्या नियमात बसत नव्हती तरीही संस्थेच्या काही सदस्यांनी अवघ्या दोन तासात वयक्तिक थोडी फार मदत करून 5 हजार पाचशे रुपये ची मदत तयार करून मुलाला मदत करण्यात आली. मिनाक्षी देरकर, सूनील ढवस, डॉ. प्रमोद खिरटकर, प्रवीण वासाडे, जगजीवन इंगोले, प्रमोद ढुमणे, मंजुषा मालेकार, दीनेश जीवतोडे, पुंडलीक बोंडे, माधुरी ताजने, मंगला बोबडे, रजनी ढुमणे, संतोष खनके, विलास लोहे, निता बोढे, तोरणा कुरेकर, रोशन मिश्रा, विजय काकडे, किसन नागरकर यांनी मदत दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद उरकुडे, किसन नागरकर, दिनेश जीवतोडे व कराटे कोच सूनिल चवरे, लता बारापात्रे उपस्थित होते.

error: Content is protected !!