Home चंद्रपुर जिल्हा विशेष व्हॉट्सॲपवर आलेली लग्नाची पत्रिका वाचताना सावधान

व्हॉट्सॲपवर आलेली लग्नाची पत्रिका वाचताना सावधान

1312

सिंदेवाही : सध्या सोशल मीडियाचा वापर करून विविध कार्यक्रमाचे निमंत्रण व्हॉट्सॲप वरून देण्याचा ट्रेंड सगळी कडे सुरू झाला आहे. लग्न सोहळा, नामकरण सोहळा, गृहप्रवेश सोहळा असो, की, यासारखे अन्य कोणतेही शुभकार्य असो. आपल्या आप्तेष्टांना , किंवा हितचिंतकांना त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हॉट्स ॲपवर पाठवून निमंत्रण दिल्या जात आज. मात्र सायबर भामट्यांनी याचा गैरफायदा घेत ए पि के नावाच्या लिंक वरून डिजिटल निमंत्रण पत्रिका पाठवून नागरिकांची लूट करीत असल्याचे दिसून येत असल्याने यापासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

.        सध्याच्या डिजिटलच्या युगात आणि धकाधकीच्या जीवनात कोणतेही शुभकार्याचे निमंत्रण ऑनलाईन व्हॉट्स ॲपवर लिंक पाठवून निमंत्रण देणे सोपे झाले आहे. मात्र हीच लग्न पत्रिका आता आपल्या लुटीचे कारण ठरत असल्याचे दिसून येत आहे. आपल्याला कोणत्याही मित्राकडून एपीके नावाच्या फॉरमॅट मध्ये लग्न पत्रिका फाईल आल्यास ती फाईल आपण सर्रास न उघडता, अगोदर मित्रांना फोन करून निमंत्रण पाठविले असल्याचे खात्री करून घ्या. तसेच अनोळखी नंबर वरून अशाच पद्धतीची डिजिटल निमंत्रण पत्रिका फाईल आल्यास ती पण उघडू नका. कारण व्हॉट्स ॲपवर आलेली लग्न पत्रिका तुमच्या लुटीचे कारण ठरत आहे. सायबर भामट्यांनी व्हॉट्स ॲपवर एक लग्न पत्रिकेचीऑनलाईन फाईल सोबत व्हायरस पाठवून लुटीचा नवा धंदा सुरू केला आहे. हे सायबर भामटे आपल्याला डिजिटल लग्न पत्रिका लिंक पाठवतात. ती पत्रिका एपीके फॉरमॅट मध्ये असते. आलेली लग्न पत्रिका लिंक उत्सुकतेपोटी आपण कोणतीही खात्री न करता उघडतो. मात्र लिंक क्लिक केल्याने आपल्या मोबाईलमध्ये एपिके फाईल डाऊनलोड होते. आणि पत्रिका मधून आलेला व्हायरस आपल्या मोबाईल मध्ये घुसतो. एकदा व्हायरस मोबाईल मध्ये घुसला की, तो आपले काम करायला सुरुवात करतो. लग्न पत्रिका फाईल उघडल्यावर काही वेळातच आपला मोबाईल बंद पडतो. आपण पुन्हा मोबाईल सुरू करणार, मात्र तो पर्यंत मोबाईल मधील सगळ्या सेटिंग बिघडून सायबर दरोडेखोर मोबाईल मधील सर्व मॅसेज सिस्टीम हॅक करतात.

.      फोन पे, गुगल पे, यासारख्या पेमेंट ॲपचा ताबा घेतात. इंस्टाग्राम, फेसबुक, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पासवर्ड मिळविले जातात. मोबाईल मध्ये सेव्ह केलेल्या आधार कार्ड, पॅन कार्डचा गैरवापर केल्या जाते. सायबर दरोडेखोर हे आपल्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतात. आपल्या फोन पे, गुगल पे वरून ऑनलाईन खरेदी सुद्धा केल्या जाते. याचा आपल्याला पत्ता सुद्धा लागणार नाही. कारण आपल्याला माहिती देणारी मेसेजिंग यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली असते. अशावेळी आपण काहीच करू शकत नाही. आपले बँक खाते तेव्हा पर्यंत रिकामे केले जाते. त्यामुळे व्हॉट्स ॲपवर आलेली लग्न पत्रिका फाईल उघडायच्या अगोदर सावधानता बाळगून त्याची खात्री करूनच उघडावी. असे पोलीस विभागाने आवाहन केले आहे.

error: Content is protected !!