Home चंद्रपुर जिल्हा विशेष संतप्त गावकऱ्यांनी सोनाई कंपनीचे ट्रक रोखून धरले

संतप्त गावकऱ्यांनी सोनाई कंपनीचे ट्रक रोखून धरले

1262

आठ दिवसापासून विसलोन गावचा पाणीपुरवठा ठप्प

पोलीस व रेल्वे प्रशासनाच्या वतीने समझोता

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

चंद्रपूर : वर्धा (सेवाग्राम) बल्लारशाह तिसरी रेल्वे लाईनच्या कामासाठी होणाऱ्या जड वाहतुकीने नंदोरी ते विसलोन मार्गांवरील रस्त्याची वाट लागली असून विसलोन गावात होणाऱ्या पाणी पुरवठा ची पाईप लाईन या वाहणामुळे लिकेज झाली परिणामी आठ दिवसापासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सोनाई कंपनीचे वाहने 5 तास रोखून धरत सोमवारी आंदोलन केले होते. दरम्यान पोलीस, रेल्वे प्रशासनाच्या माध्यस्थीने सोनाई कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

.         वर्धा (सेवाग्राम) बल्लारशाह तिसरी रेल्वे लाईनचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या रेल्वे लाईनचे काम भद्रावती तालुक्यातील विसलोन येथून सुरु करण्यात आले. यासाठी सोनाई इन्फ्रा कंपनीला कंत्राट देण्यात आले. सोनाई कंपनीने नंदोरी येथील उमरे यांच्या शेतातून मुरूम माती भरून हायवा वाहनाने रेल्वे साईडवर मुरूम टाकण्याचे काम सुरु केले. मात्र याच मार्गाने विसलोन गावाची पाणीपुरवठा पाईप लाईन टाकल्या गेली आहे. वाहनाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे पाणी पुरवठ्याची पाईप लाईन लिकेज झाली. परिणामी आठ दिवसापासून विसलोन गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला. यामुळे संतप्त झालेल्या विसलोन गावकऱ्यांनी नंदोरी विसलोन मार्गांवरील सोनाई कंपनीचे कार्यालय जवळ मुरुमाने भरलेली हायवा ट्रक रोखून धरत आंदोलन पुकारले होते. यानंतर गावकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वे, पोलीस अधिकारी राकेश कुमार यादव, सोनाई इन्फ्रा कंपनी चे व्यवस्थापक योगेश माहुरे, रेल्वे अधिकारी दाखल झाले व विसलोन गावकऱ्यांची समस्या जाणून घेत तात्काळ पाईप लाईन टाकून देण्याचे आदेश दिले. व रेल्वे हद्दी पर्यंत काँक्रेट रोड, जड वाहणामुळे खराब झालेला रस्ता पूर्व स्थितीत जैसे थे तयार करणार, वाहणाची स्पीड लिमिट 30 किमी नुसार राहणार, वळणावर रेट लाईट सिग्नल लावणार व अपघात झाल्यास कंपनी जबाबदार राहणार असल्याचे सोनाई इन्फ्रा कंपनी व रेल्वे प्रसासनाच्या वतीने विसलोन गावकऱ्यांना लेखी लिहून देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठराव देताना ग्रामपंचायत च्या मागण्या                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             आंदोलनादरम्यान विसलोन ग्रामपंचायत च्या ग्रामसेविका यांनी रेल्वे, महसूल प्रशासनाला दिलेल्या ग्रामपंचायत चा ठराव गावकऱ्यांना वाचून दाखविला. या ठराव नुसार प्रशासनाने विसलोन गावाच्या समस्या दूर करण्याची मागणी केली होती. या ठरावात म्हटले आहे कि, मौजा विस्लोन येथे नविन अंडरब्रिज तयार होत असुन गावकऱ्यांना नंदोरी मार्गे ता. भद्रावती वा अन्य ठिकाणी जाण्या-येण्याकरिता 2 किमी. चा फेरा पडत आहे. व गावात वैयक्तिक वाहतुकीच्या साधना व्यतिरिक्त इतर वाहतुकीचे साधन नसल्यामुळे गावालगतचा जुना रेल्वे पुलाखाली पक्क्या रस्त्याचे बांधकाम करुन देण्यात यावे व याव्यतिरिक्त ग्रा.पं. विस्लोन येथील पिण्याचे पाण्याची बोरवेल नंदोरीच्या क्षेत्रामध्ये असुन नंदोरी ते विस्लोन गावापर्यंत पाईप लाईन अंडरग्राऊंड फिटिंग करुन देण्यात यावे. पाईपलाईन अंडरग्राऊंड फिटिंग करण्याबाबत १ लाख ७३ हजार रुपयाची रेल्वे विभागाकडुन ग्रामपंचायतीला केलेली मागणी माफ करण्यात यावी. सरकारी रस्ता रेल्वे विभागाकडुन हस्तांतरीत केल्यानंतर गावालगत दुसरा नंदोरी ते विस्लोन मेन रस्ता तयार करुन देण्यात विस्लोन गावालगतचा जुना रेल्वे पुल ८३८/८ व ८३८/९ LHS पुलामधुन नंदोरीकडुन येणारा मेन रोड ते जि.प.शाळा विस्लोन पर्यंत पक्का रस्ता व नाली (सिमेंट कॉक्रिट रोड व नाली) चे बांधकाम करुन देण्यात यावे. रेल्वेचा नविन तयार होणाऱ्या ब्रिजखाली पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचुन राहण्याची शक्यता असल्यामुळे सदर पाण्याचा योग्य प्रकारे विल्हेवाट कायमस्वरुपी करुन देण्यात यावा.” शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्याकरिता रस्ता, शेतातील विजपुरवठा व ओलीत शेतीचा समस्यांचे निराकरण करण्यात यावे. अशाप्रकारच्या गावकऱ्यांच्या संपुर्ण मागण्या पुर्ण होतील तेव्हाच ग्रामपंचायत विस्लोनची वर्धा (सेवाग्राम) बल्लारशाह तिसरी रेल्वे लाईन करिता शासकीय जमिन हस्तांतरीत करण्याबाबत हरकत नाही असे ठरावत लिहिण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने कामे करावी अशी मागणी सरपंच अंकुश मेश्राम यांनी केली आहे.

error: Content is protected !!