नागभीड : तालुक्यातील बामणी येथे जलद बसचा थांबा मंजूर झालेला आहे. या बाबतचा पत्रव्यवहार चिमूर गडचिरोली क्षेत्राचे खासदार यांना करण्यात आला आहे.
. बामणी हे गाव नागभीड पासून 5 किमी असून ते नगरपरिषद नागभीड मध्ये समाविष्ट आहे. बामणी पासून अनेक विद्यार्थी व प्रवासी ये – जा करतात. प्रवासी व विद्यार्थ्यांना तास न तास ताटकळत राहावे लागे. त्यामुळे या क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान यांनी रापम गडचिरोली यांच्याशी पत्राव्यवहार केला होता. त्या पत्राची राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली यांनी दखल घेऊन बामणी येथें जलद बसचा थांबा मंजूर केला आहे. तश्या सूचना राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली यांनी आगार व्यवस्थापक यांना दिल्या आहेत. त्यानुसार गडचिरोली – नागपूर, नागपूर – गडचिरोली, ब्रम्हपुरी – नागपूर, नागपूर – ब्रम्हपुरी तसेच रापम चंद्रपूर, रापम भंडारा यांनाही कळविले आहे.


