वाघाला पकडण्यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर
रस्त्यावरील झुडपे केले साफ
पंकज रणदिवे
नेरी : नेरी परिसरात शेतकरी, मजुर व नागरिकांची झोप उडवणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी वनविभाग सतर्क झाला असून ॲक्शन मोडवर आला आहे. वाघाला पकडण्यासाठी एक पिजरा नेरी जवळील सरडपार शेतशिवारात मांडला असून दुसरा पिजरा सुद्धा वाघाला पकडण्यासाठी तयार ठेवला असून वाघावर त्याच्या हालचालीवर वनविभाग नजर ठेवून आहे.
. नेरी परिसरातील सरडपार वाघेडा वडसी गोदेडा खातोडा खांबाडा खुंटाला सिरपूर नेरी अडेगाव देश पांढरवाणी या गावातील शेतशिवरात वाघाचे रोजसरास दर्शन होत असल्याने शेतकरी मजुरवर्ग आणि नागरिक भयभीत झाली होती. तसेच वडसी पंढरवानी येथील महिलांवर केलेला हल्ला तसेच सरडपार येथे ट्रकटर चा पाठलाग यामुळे वाघाची दहशत या परिसरात निर्माण झाली होती. या सर्व बाबीची तेवढ्याच गांभीर्याने वनविभागाने दखल घेतली. त्यामुळे नागरिक आणि वनविभागाचे सलोखे निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. आता वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने दोन पीजरे लावले असून 40 कर्मचारी 4 मोटार व्हेहीकल अनेक ठिकाणी ट्राब कॅमेरे लावले असून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवले आहे. मात्र वाघ नेमका कुठं आहे हे अंदाज बांधता येत नसल्याचे वनकर्मचारी सांगीत आहेत जेव्हा वाघ दिसतो. तेव्हा वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होते. मात्र त्यानंतर तो निघून जातो. आणि लगेच दुसऱ्या स्थळा वर दिसतो त्यामुळे अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.
. मात्र वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल असे वनविभाग सांगीत आहे. अडेगाव देश म्हसली वडसी वाघेडा या गावातील परिसरात मार्गावर स्ट्रीट लाईट लावण्यात आले असून वडसी मार्गावरील झुडपे मशीन च्या साहयाने साफ करण्यात आले आहे. वाघ तात्काळ दिसावा तसेच प्रकाशात वाघ येत नसल्याने गावात वाघ येणार नाही. हा यामागचा उद्देश आहे त्यामुळे हानी होणार नाही एवडी काळजी वनविभागाने घेतली असून वाघाला पकडण्यासाठी वनविभाग सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


