विरूर स्टेशन रेल्वे रुळावर आढळला युवकाचा डोकं धडापासून अलग असलेला मृतदेह
राजुरा : तालुक्यातील विरूर स्टेशन नजीक एक किलो मीटर अंतरावर विरूर माकुडी दक्षिण मध्य रेल्वे मार्ग रुळावर एका युवकाचा मृतदेह सकाळच्या सुमारास आढळल्याने गावात एकच खळबळ माजली असून यात घातपात असल्याचे मृतकाच्या कटुंबीयांनी आरोप लावल्याने यात संशय व्यक्त होत असून गावात कुजबुज होत आहे.
. पोलीससूत्रा कडून मिळालेल्या माहिती नुसार राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील निलेश जितेंद्र डवरे वय 25 वर्ष हा बुधवार रात्रौ 9 वाजता आपल्या घरून एका व्यक्ती सोबत बाहेर गेला. मात्र तो सकाळ पर्यंत घरी न पोहचल्याने त्याची शोधाशोध निलेश च्या आई वडिलांनी केली. तेव्हा विरूर कब्रस्तान जवळील जंगला लगत मध्य रेल्वे रुळावर शुक्रवार सकाळ च्या सुमारास त्याचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली. याची माहिती निलेश च्या कुटुंबियांना व पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून तपासणी केली असता धडापासून शरीर व पाय बाजूला पडलेले आढळले व काही अंतरावर रुळाच्या खाली झुडपामध्ये रक्त रेतीने लपविल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. तेव्हा घटनेची प्राथमिक अंदाजित परिस्थिती पाहता मृतक कुटुंबीयांनी माझ्या मुलाची आत्महत्या नसून हा घातपातच असल्याचा आरोप लावला. त्यामुळे गावात वेगळ्याच चर्चेला पेव फुटले व पोलिसांनी तपासाचे चक्र गतीने फिरविले.
विरूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु ची नोंद करून फॉरेन्सिक टीम व श्वान पथक बोलावून तपास सुरू आहे . सदर तपास अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर, विरुर स्टे. चे सहायक पोलिस निरीक्षक संतोष वाकडे, पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार, विजू मुंडे, अतुल सहारे हे करीत आहे.


