Home सामाजिक मोफत आरोग्य शिबीर राबवून केले महामानवास अभिवादन

मोफत आरोग्य शिबीर राबवून केले महामानवास अभिवादन

1319

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचा उपक्रम

भद्रावती : स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने दि.०६ डिसेंबर ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामिण रुग्णालय यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ मोफत आरोग्य शिबिर राबवून बाबासाहेबांना अभिवादन केले.

.      या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. यामध्ये २५० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह आणि ECG तपासणी करण्यात आल्या. तसेच आयुष्यमान कार्ड काढून देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती भद्रावतीच्या वतीने या शिबिराला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे, नागरिकांचे तसेच ग्रामिण रूग्नालय, भद्रावती च्या चमुचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!