Home सामाजिक विवेकानंद महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनी

विवेकानंद महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनी

1295

भद्रावती : विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले.

.        या प्रदर्शनीला विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजू गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले, सदस्य शैलेश महाजन, प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. सुधीर आस्टुनकर, श्रध्दा वऱ्हाडे यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रदर्शनीला अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी भेट दिली.

error: Content is protected !!