जूनोणा फाट्याजवळील घटना
बल्लारपुर : चंद्रपूरकडून बल्लारपूरकडे कोळशाची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकने पादचारी महिलेला चिरडल्याची घटना शनिवार (दि.७) ला दुपारी १२-३० वाजता जूनोना फाटा जवळील हिंग्लाज भवानी शाळा बाबुपेठ समोरील महामार्गावर घडली. अपघात इतका भीषण होता की; त्यामध्ये महिलाच्या डोके अक्षरशा चंदामेंदा झाले. मृत महिलेचे नाव राधा मंगलराज देवांग (५८) राह. लालपेठ कॉलनी चंद्रपूर असल्याची माहिती रामनगर पोलिसांकडून मिळाली.
. चंद्रपूरकडून बल्लारपूरकडे कोळशाची वाहतूक करणारा ट्रक एमएच ३४ बीझेड ७९७२ ट्रक सुसाट वेगात बल्लारपूरकडे जात होता अचानक हिंग्लाज भवानी शाळेकडून राधा देवांग ही रस्ता ओलांडत होती. तेंव्हा चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने महिलेला चिरडले. या घटनेत तिच्या डोक्याचे चिंधड्या उडाल्या व जाग्यावरच गतप्राण झाली ट्रकचालकाने ट्रक जाग्यावर ठेवून फरार झाला. रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदे शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेचा पुढील तपास पी आय आसिफ राजा शेख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.


