चिमूर : राज्यात निवणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक सभा गाजवत आहेत. दरम्यान विदर्भातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १२नोव्हेंबर मंगळवारला क्रांतीभूमी चिमूर मध्ये येणार आहेत.
. चिमूर येथील पिंपळनेरी मार्गावरील प्रसस्त मैदानावर त्यांची सभा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडनवीस अनेक मंत्री, हेविवेट नेते उपस्थित राहणार आहेत. या सभे दृष्टीने प्रशासन सज्ज असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. चिमूर मध्ये अनेक मोठ्या प्रशासकिय अधिकारी यांच्या भेटी सुरू आहेत.
. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रथम चिमूर आगमनाने भाजपा व महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या समवेत जनतेत उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. प्रशस्त अश्या १८ एकर मैदानावर लाखाच्यावर नागरिक विदर्भातून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन अलर्ट मोड वर असून आता पर्यंत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक रीना जणबंधू तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांची सभास्थळावर पाहणी व भेट झाली आहे.


