शंकरपुरात भीतीचे वातावरण
नेरी : संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टीबी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नागरिकांना टीव्ही प्रतिबंध लस दिल्या जात आहे. परंतु शंकरपूर मध्ये प्राथमिक स्वास्थ्य केंद्र येथे चुकीच्या ठिकाणी लस टोचल्यामुळे नागरिकांना मोठमोठ्या जखमा झाल्या असून शंकरपूर येथील व परिसरातील नागरी या जखमामुळे भयभीत झाले आहेत.
. प्राथमिक स्वास्थ्य केंद्र शंकरपूर येथील नागरिकांना खांद्यावरील हाडाला टीबीची लस टोचल्यामुळे नागरिकांच्या खांद्याला मोठमोठ्या जखमा झालेल्या आहेत. ही जखम झालेले नागरिक औषधोपचार करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात परंतु येथील कर्मचारी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. या जखमा मधून पस वाहत असून ही जखम स्वच्छ करून त्यावर औषधोपचार करणे व त्यावर मलमपट्टी करणे आवश्यक असताना फक्त गोळ्या देऊन रुग्णांना घरी पाठवल्या जात आहे. ही लस घेऊन महिना झाला तरीही जखम बरी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
. या रुग्णांना जखमेचे दुखणे कमी करण्यासाठी किंवा घाव सुकण्यासाठी औषधोपचार करणे आवश्यक असताना रुग्णांना डायबिटीस च्या गोळ्या देण्यात येत आहे. त्यामुळे योग्य उपचार होत नसल्याने दिवसेंदिवस नागरिकांना झालेल्या जखमा या वाढत आहेत त्यामुळे चुकीच्या ठिकाणी हाडावरती दिलेल्या लसीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शंकरपूर तसेच परिसरातील नागरीक करीत आहेत.


