सिंदेवाही : सध्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक रणधुमाळी सुरू असून अनेक पक्षाने आपापले उमेदवार उभे केले आहे. प्रत्येक पक्षाने प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ राहुल मेश्राम यांचे हस्ते प्रचार कार्यालयाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.
. वंचित बहुजन आघाडी हा एक तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्र राज्यात पाहिले जाते. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. राहुल मेश्राम हे उभे आहेत. त्यांची सर्व प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. त्या अनुषंगाने सिंदेवाही येथील बँक ऑफ इंडियाच्या बाजूला श्री रामकृष्ण अगडे यांचे घरी प्रचार कार्यालय सुरू केले असून या कार्यालयातून प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संघटक बलदेव चाहांदे यांचे अध्यक्षतेखाली डॉ. राहुल मेश्राम यांनी प्रचार कार्यालयाचे उदघाटन केले आहे.
. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मुखरुजी बनसोड, माजी अध्यक्ष गजानन मेश्राम, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष कुंदा शेंडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अंबादास कोसे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शुभांगी खोब्रागडे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत गोडबोले, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मुकेश शेंडे, किशोर साखरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई पाझारे, पौर्णिमा डांगे, प्राजक्ता खोब्रागडे, मीनाक्षी बारसागडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते


