Home चंद्रपुर जिल्हा विशेष शंकरपूर येथे इसमाची आत्महत्या

शंकरपूर येथे इसमाची आत्महत्या

1332

नेरी : शंकरपूर येथील वार्ड नंबर तीन मध्ये रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने घराच्या स्लॅबवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

.     प्राप्तमाहिती नुसार शंकरपूर येथील रहिवासी असलेले रामकृष्ण हरीराम तुरारे 40, हे दुपारच्या वेळी घरी कोणी नसताना स्लॅब च्या सळखीला दोर बांधून स्लॅब वरून उडी घेतली. त्यात त्याचा गळफास लागून मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आलेले आहे. आत्महत्या मागे नेमकं कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवि वाघ करीत आहे.

error: Content is protected !!