Home चंद्रपुर जिल्हा विशेष रस्ता ओलांडताना बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप

रस्ता ओलांडताना बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप

1324

तीन गंभीर 

कोठारी-देवई मार्गावरील घटना

कोठारी : कोठारी वरुण देवईकडे दुचाकीने तीन जण जात होते. दरम्यान कक्ष क्र.१०४ येथे बिबट रस्ता ओलांडत असतांना अचानक दुचाकीवर झडप घेतली. यात दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना  मंगळवार दि २४ सप्टेंबर ला सकाळी ८ वाजताच्या सुमारास वन विकास महामंडळाच्या झरण वनक्षेत्रात घडली. साईनाथ अनिल भोयर,विजय कालिदास साखरकर व देवानंद काशिनाथ कुमरे असे जखमींचे नवे आहे. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

.      सविस्तर वृत्त असे, देवानंद कुमरे आपल्या दोन सहकाऱ्यांसह दुचाकीने पेंटिंगच्या कामासाठी देवई कडे सकाळी जात होते. कोठारी-देवई हा घनदाट जंगली मार्ग असून वन्य प्राण्यांचा रहदारीचा मार्ग आहे. सकाळी बिबट रस्ता पार करण्यासाठी रस्त्याचे कडेला आला असता त्याचे समोर अचानक दुचाकी आली असता बिबट्याने दुचाकीवर हल्ला करून झेप घेतली.त्यात तिघेही जखमी झाले.दुचाकीवर स्वार असलेल्यानी जोरजोराने आरडाओरड केल्याने  बिबट् पळून गेला.नशीब बलवत्तर असल्याने या घटनेत कुणाचीही जीवित हानी झाली नाही. मात्र या हल्ल्यात तिघांच्याही हाताला, पायाला, मानेला बिबट्याच्या पंजाचे नखाने ओरबडले व गंभीर जखमी झाले.

.      या घटनेची माहिती झरण वनपरिक्षेत्रातील अधिकारी मडावी यांना समजताच ताफ्यासह घटनास्थळावर तात्काळ पोहचवून जखमींना उपचारासाठी कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय वाहनाने आणले. पुढील उपचारार्थ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.घटनेचा मोका पंचनामा करून पुढील कार्यवाही वनाधिकारी एस.डी. मडावी करीत आहेत.बिबट्याचे हल्ल्यात जखमी झालेल्यांना शासकीय मदत देण्याची मागणी वंचितचे सिद्धार्थ शंभरकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!