आ. भांगडिया यांनी उपचारासाठी दिला मदतीचा हात
नेरी : चिमुर तालुक्यातील आंबेनेरी येथील राकेश शिवरकर हे ट्रॅकटर अपघातात जखमी झाले असून त्यांचेवर नागपूर येथे उपचार सुरू आहे. त्याच्या उपचारासाठी आमदार भांगडिया यांनी मदतीचा हात देत राकेशच्या पत्नीला शेतावरील बांध्यावर जाऊन आर्थिक मदत दिली.
. जखमी राकेश व त्याची पत्नी मोलमजुरी करून पोट भरते. सदर बाबीची दखल या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी घेतली आणि शिवरकर यांना मदत जाहीर करीत कार्यकर्त्यांच्या हस्ते पोहचती केली. मात्र अपघात ग्रस्तांची पत्नी मजुरीसाठी शेतावर गेली होती. तेव्हा सदर मदत बांधावर पोहचवून देऊन निरजना राकेश शिवरकर यांना देण्यात आली शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मदत दिल्याने सर्वत्र आमदार बंटी भांगडिया यांचे कौतुक होत आहे.
. सदर मदत ही भाजपा जेष्ठ कार्यकर्ते रमेश कंचर्लावार भाजपा किसान सेल तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे जेष्ठ नेते दिगंबर खलोरे, सरपंच कोलते, शक्ती केंद्र प्रमुख सतीश वानखेडे तसेच भाजपा कार्यकर्ते व शेतकरी वर्ग उपस्थित होते.


