Home चंद्रपुर जिल्हा विशेष मदनापुर येथील सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करा

मदनापुर येथील सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करा

1370

ग्रामस्थांची मागणी 

आर्थिक व्यवहारात अपहार

चिमूर : तालुक्यातील मदनापुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात 2023-24 या वर्षीची ग्रामसभा घेण्यात आली होती. यात काही वस्तूंची परस्पर खरेदी न करता कच्चे व बनावट बिल आढळून आल्याने ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांचे वर कारवाई करण्याचे निवेनाद्वारे शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

.       सविस्तर वृत्त असे की, मदनापुर येथील ग्रामपंचायची 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जमा खर्चाचा हिशोब घेण्यात आला. सदरील ग्रामसभेत हिशोब घेते वेळी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी वस्तू खरेदी न करता बिल जोडून रकमेची उचल केलेलीं आढळलं तसेच बाकी काही बिल कच्ची व बनावट खोटी असल्याचे आढळून आले. शासनाची जीएसटी असलेली बिले आवश्यक असल्याने तसे नव्हते, स्वतःच्या आर्थिक हिताचे व्यवहार केले असल्याचे दिसले. ग्रामसेवक व सरपंच यांनी संपुर्ण फंडाचे बनविलेले व्हाउचर हे ऑनलाइन इ – ग्राम स्वराज आणि ग्रामसभेत सादर केलेली यात तफावत आढळून आली.

.       यात शासनाची व नागरिकांची दिशाभूल केली. यामुळे ग्रामसभेत ठराव घेऊन संबंधित ग्रामसेकांस निलंबित व सरपंच यांना पदावरून पायउतार करावे. संबंधितावर तात्काळ कारवाई न केल्यास ग्रामपंचातला कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

error: Content is protected !!