Home चंद्रपुर जिल्हा विशेष घरात घुसून शेळ्यावर ताव मारणारा बिबट अखेर जेरबंद

घरात घुसून शेळ्यावर ताव मारणारा बिबट अखेर जेरबंद

1198
  • नवरगाव उपवन क्षेत्रातील गडबोरी येथील घटना

सिंदेवाही : वनपरिक्षेत्र कार्यालय सिंदेवाही अंतर्गत नवरगाव उपवन क्षेत्रातील गडबोरी येथे घरात घुवून शेळ्यावर ताव मारत असलेल्या बिबट्याने गावात दहशत निर्माण केली होती शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे.

.       शुक्रवारी सकाळी पाच वाजताच दरम्यान बिबट्याने घरात घुसून मंसाराम चौके यांचे बकऱ्याला ठार केले. आणि गावालगत असलेल्या शेतात घेऊन गेला. मात्र सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच आरडाओरड केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली होती. सकाळी आठ वाजता घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. आणि नागरिकांच्या मागणी नुसार बिबट्याला पकडण्यासाठी सदर परिसरात पिंजरा लावण्यात आला. आणि त्या पिंजऱ्यामध्ये सकाळी मारलेला बकरा ठेवण्यात आला. बिबट्याने मारलेली बकऱ्याची शिकार शोधत शोधत बिबट पिंजऱ्याजवळ आला. आणि शिकार दिसताच सायंकाळी साडे सहा वाजता पिंजऱ्यात अडकला. यासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक शिवशंकर उसेंडी, वनरक्षक जितेंद्र वैद्य, आणि इतर वनमजूर यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!