वरोरा : तालुक्यातील भटाळा येथील हेमाळपंती भोंड्या शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्री निमित्त तीन दिवस मोठी यात्रा भरली जाते. या यात्रेसाठी व महादेवाचे दर्शन घेण्यासाठी अख्या महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त येत असतात. प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली जात असुन सुरक्षेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा मोठ्याप्रमाणात केला जातो. या यात्रेत नाटक, सिनेमा थेटर, विविध प्रकारची दुकाने थाटली गेली. यावर्षी नेहमी पेक्षा भाविकांची वाढती गर्दी पाहून बंदोबस्त करिता पोलीस प्रशासनाने जिल्हातून पोलीस बोलावले होते.![]()
. भक्तांच्या वाहनाना पार्किंग व्यवस्थित लावण्यासाठी तसेच येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना दर्शन घेण्यासाठी देवस्थान कमिटीने नेमलेले स्वयंसेवक आणि पोलीस स्टाप सर्व भाविकांची काळजी घेत होता. पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शैलेद्र ठाकरे, सरपंच, उपसरपंच हरीश जाधव ग्रामपंचायत सदस्य हे तळ ठोकून या यात्रेत बसले होते. जय भोले, हर हर महादेव च्या गर्जनाने भटाळा मंदिर परिसर दुमदूमला होता. अनेक भक्त (बाण) त्रिशूल घेऊन डीजेच्या तालात थरथरत होती. यात्रेचा पहिला दिवस हा शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडला.


