- दीपक झोडे व गावकऱ्यांची मागणी
नेरी : नेरीवरून जवळ असलेल्या आणि जंगलाच्या टोकावर असलेल्या अडेगाव को ला गावात जाणाऱ्या मार्गाची दुर्दशा झाली. जागोजागी खड्डे पडले आहे. तर काही ठिकाणी गिट्टी बाहेर आली आहे. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे संबंधी विभागणे लक्ष देत तात्काळ रस्त्याची दुरूस्ती करावी. अशी मागणी दीपक झोडे व गावकऱ्यांनी केली आहे.
. बोथली गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अडेगाव या गावाला जाणाऱ्या मार्गाची मागील 6 वर्षांपूर्वी दुरुस्ती केली होती मात्र निकृष्ठ दर्जाचे बांधकाम केल्याने संपूर्ण मार्ग उखळून गिट्टी बाहेर आली. त्यामुळे नागरिकांना रहदारी करताना नाहक त्रास होत आहे तसेच वाहने चालविताना नेमके कुठून चालवावे असा प्रश्न निर्माण होत आहे. आमदार बंटी भांगडीया हे रस्त्याच्या लोकार्पण सोहळा करिता गावात आले असता त्यांना गावकर्यांनी या मार्गाची अवस्था सांगितले असता त्यांनी मार्ग बनविण्याचे आश्वासन दिले. मात्र या रस्त्याची स्थिती बिकट असल्याने तात्काळ मार्ग बनवावा अशी मागणी दीपक झोडे व गावकऱ्यांनी केली आहे.


