Home सामाजिक आशिष देरकर यांची सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी निवड

आशिष देरकर यांची सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी निवड

1234

गडचांदूर : सरपंच परिषद मुंबईच्या वतीने चंद्रपूर जिल्हा सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

.      सरपंच परिषद, मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव यांनी शुक्रवारी पत्र पाठवून ही नियुक्ती केली. प्रा. आशिष देरकर गेल्या दोन पंचवार्षिकपासून बिबी ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून कार्यरत असून नाविन्यपूर्ण विकासकामे करून गावाचे नावलौकिक वाढविले आहे. जिल्ह्यात सरपंच परिषदेचे संघटन मजबूत करुन सरपंच मंडळींच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार प्रा. आशिष देरकर यांनी केला आहे.

.      निवडीबद्दल सरपंच परिषद मुंबईचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस, राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय (बापू) जगदाळे व मित्रमंडळींनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!