- तिन्ही युवक यवतमाळ जिल्हातील वणी येथील रहिवाशी
- वर्धा नदीत अंघोळ करण्यासाठी उतरले होते पाण्यात
- भटाळा येथे गेले होते दर्शनाला
कुचना : वरोरा तालुक्यातील भटाळा येथील महाशिवरात्री निमित्त हेमाळपंती शिवमंदिराचे दर्शन करून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे परत जात असताना पाटाळा येथील वर्धा नदीत अंघोळ करण्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात उतरले मात्र पाण्याचा अंदाज आल्या नसल्याने खोल पात्रात बुडून तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना महाशिवरात्री दिनी शुक्रवारी सांयकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली. हर्षद चाफले,अनिरुद्ध चाफले,संकेत नगराळे (सर्व रा. वणी जि. यवतमाळ) अशी मृतकाची नावे आहेत.
. वरोरा तालुक्यातील भटाळा येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरली जाते. या यात्रेकरिता आणि भोंड्या महादेवाच्या दर्शनासाठी दुरदुरून भाविक येत असतात. यवतमाळ जिल्हातील वणी येथील विठ्ठलवाडी भागातील ११ जण भटाळा येथील शिवमंदिर येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन करून परतीच्या मार्गांवर जात असताना पाटाळाच्या वर्धा नदीत अंघोळ करण्यासाठी ११ जण नदीपात्रात उतरले. अंघोळ करून नदीपात्रातून फक्त ८ जण बाहेर आले . मात्र हर्षद चाफले,अनिरुद्ध चाफले,संकेत नगराळे बाहेर आले नाही ते खोल पाण्यात गेल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
. त्या तिघांना वाचविण्यासाठी सोबत असलेल्या मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी अधिक असल्याने त्याचा पत्ता लागला नाही. घटनेची माहिती होताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती तर यवतमाळ व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्याला जोडणारा वर्धा नदीत सदर घटना घडल्यामुळे दोन्ही जिल्ह्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होवून तिघांची शोधमोहीम सुरु केली. मात्र . वृत्त लिहेपर्यंत तिघांचा मृतदेह हाती लागला नव्हता. शिवरात्रीच्या दिवशी तिघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे शोककळा पसरली आहे.


