Home शैक्षणिक चंदनखेडा येथे मुख्याध्यापक वामनराव रिंगणे यांचा सेवानिवृत्त सत्कार निरोप समारंभ

चंदनखेडा येथे मुख्याध्यापक वामनराव रिंगणे यांचा सेवानिवृत्त सत्कार निरोप समारंभ

1591
  • अमूल्य योगदानाबद्दल सेवानिवृत्ती वेळी वामनराव रिंगणे यांचा झालेला सत्कार मन भारावून टाकणारा ठरला. 

चंद्रपूर :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,चिमुर अंतर्गत येत असलेल्या भद्रावती तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा , चंदनखेडा येथून मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झालेले वामनराव जागोबाजी रिंगणे यांचा नुकताच त्यांच्या 34 वर्षांच्या आदिवासी विकास विभागातील अमूल्य सेवेच्या योगदानाबद्दल शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चंदनखेडा च्या वतीने सेवानिवृत्तीच्या दिवशी सपत्नीक सत्कार व निरोप समारंभ चंदनखेडा येथे थाटात संपन्न पार पडला. दरम्यान आदिवासी विकास विभागातील सेवेच्या प्रदीर्घ काळाच्या जुन्या आठवणीने अनेकांचे मन भारावले असल्याचे चित्र दिसत होते.

वामनराव रिंगणे यांनी आदिवासी विकास विभागामध्ये 34 वर्षे प्रदिर्घ काळ सेवा पूर्ण केली, त्यांच्या त्या सेवा कार्याचा गौरव करण्यासाठी चंदनखेडा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले.    या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभा च्या अध्यक्षस्थानी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चंदनखेडा चे प्रभारी मुख्याध्यापक गजेंद्र सोनुने तर प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमुर सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक बेलेकर, चंदनखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.समिक्षा रिंगणे , वैद्यकीय अधिकारी डॉ.देवान्शीश सत्कार मुर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक वामनराव रिंगणे ,मरेगांव आश्रमशाळा शिक्षिका संध्या रिंगणे, सरस्वती रिंगणे, पत्रकार गांधी बोरकर,जिवती आश्रमशाळा मुख्याध्यापक चंद्रशेखर दंदे , कोसंबी – गवळी आश्रमशाळा मुख्याध्यापक प्रभाकर भांडारकर,चंदनखेडा ग्रामपंचायत उपसरपंच भारती उरकांडे , माजी उपसरपंच विठ्ठलराव हनवते ,पाटण आश्रमशाळा मुख्याध्यापक वासूदेव राजपुरोहित, चिंधीचक आश्रमशाळा मुख्याध्यापक मोहन आकुलवार , चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश श्रीरामे ,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी जी.एस.ठाकरे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिपक झाडे , यशवंत देवगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या वेळी मंचावरील सर्व मान्यवरांनी सत्कार मुर्तीच्या जीवनावर प्रकाश ज्योत टाकला व पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व उपस्थितांना मार्गदर्शन केले.सत्कार समारंभामध्ये सत्काराला उत्तर देताना सत्कार मुर्ती वामनराव रिंगणे यांनी आश्रमशाळा चंदनखेडा व आदिवासी विकास विभाग येथिल अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल कूतज्ञता व्यक्त करून दिलेले प्रेम , मानसन्मान व सेवा कालावधीत केलेले सहकार्य कधीही विसरणार नाही असे भावनिक मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका शितल नागपुरे, तर आभारप्रदर्शन माध्यमिक शिक्षक ज्ञानेश्वर सोनुले यांनी केले .या प्रसंगी चंदनखेडा आश्रमशाळेच्या विद्यार्थीनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, महिला अधिक्षिका, अधिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चंदनखेडा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!