Home शैक्षणिक जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात ‘श्री साई आयटीआय’ची बाजी

जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात ‘श्री साई आयटीआय’ची बाजी

333

क्रिकेट स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

भद्रावती येथे संपन्न झाला तीन दिवसीय क्रीडा सोहळा

विजेत्या संघाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव 

भद्रावती : येथील प्रियदर्शिनी खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने १२ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात श्री साई खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) संघाने क्रिकेट स्पर्धेत वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक पटकावला.

.       या तीन दिवसीय महोत्सवात जिल्ह्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसह विविध महाविद्यालयांतील प्रशिक्षणार्थींनी मोठा उत्साह दाखवला. महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि कबड्डी अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सामने अत्यंत चुरशीचे आणि खिलाडूवृत्तीने पार पडले.

.       क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्री साई आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जेतेपदावर मोहर उमटवली. या विजयी संघाला प्रियदर्शिनी आयटीआयचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवर, धर्मेंद्र हवेलिकर आणि डॉ. यशवंत घुमे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

.       या यशाबद्दल बोलताना विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाचे श्रेय मार्गदर्शक ताराचंद उमरे, कालिदास रंगारी, प्रवीण लांडगे आणि सर्व ट्रेडच्या शिल्प निदेशकांना दिले. संस्थेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत असून, श्री साई आयटीआयने क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

error: Content is protected !!