Home शैक्षणिक राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत वरोराच्या नीता बोढे अव्वल

राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत वरोराच्या नीता बोढे अव्वल

360

हिंगोली येथील स्पर्धेत पटकावले प्रथम स्थान

विवेकानंद विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

वरोरा : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत वरोरा येथील शिक्षिका नीता गणेश बोढे यांनी प्रथम क्रमांक पटकावून देदीप्यमान यश संपादन केले आहे.

.      हिंगोली येथे राज्यभरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी या विशेष लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वरोरा येथील विवेकानंद विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षिका नीता गणेश बोढे यांनी सहभाग घेतला होता. आपल्या बहारदार सादरीकरणाने त्यांनी परीक्षकांची मने जिंकली आणि राज्यस्तरावर अव्वल स्थान प्राप्त केले.

.      त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून आनंद व्यक्त होत असून, विवेकानंद विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने, मुख्याध्यापकांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नीता बोढे यांच्या या यशामुळे वरोरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!