Home विदर्भ टमाटरचा भाव जोमात ; गृहिणी गेल्या कोमात

टमाटरचा भाव जोमात ; गृहिणी गेल्या कोमात

821

महेंद्र कोवले 

सिंदेवाही :- सध्या बाजारात गेल्यावर फक्त एकाच वस्तूची चर्चा होताना दिसते… आणि ती म्हणजे टमाटर. असे म्हणतात की, कुणाला कधी कमजोर समजू नये. कारण कधी काळी त्यांचेही दिवस येत असतात. नेहमीं कवडीमोल भावात विकला जाणारा टमाटर आता सर्व भाजीपाल्यावर अधिराज्य गाजवीत असून दररोज टमाटरच्या किमती वाढत असून सध्या प्रति किलो २०० रुपयाचे वर विकला जात असल्याने टमाटरचा भाव जोमात ; आणि गृहिणी गेल्या कोमात..! अशी म्हणण्याची पाळी आली आहे.

मागील काही दिवसापूर्वी निसर्गाचा शेती व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असल्याने टमाट्याच्या उत्पादनात मोठी घट झाली. अर्थशास्त्रीय नियमानुसार पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने टमाट्याचे भाव दिवसागणिक वाढायला लागले आहेत. वास्तविकता अशी की, जरी टमाटरचे भाव चारपट पाचपट वाढले असतील तरी याचा फायदा प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना होईल. हा संशोधनाचा विषय आहे. कारण आज पर्यंत कोणत्याही मालाची किंमत वाढली की त्याचा फायदा व्यापारी, अडत्या यानाच झालेला आहे. शेतकरी मात्र नेहमी प्रमाणे कंगाल झालेला आहे. मिळालेल्या माहिती नुसार बाजारात भरमसाठ मिळणारा टमाटर सध्या व्यापारी आणि अडत्यानी कृत्रिम टंचाई निर्माण केली असून बाजारात पाहिजे त्या प्रमाणात टमाटर येत नाही. त्यामुळे सध्या टमाटरची किंमत गगनाला मिळत आहे. शेतकरी राजा राबराब राबून मेहनत घेऊन शेतमाल पिकवतो. मात्र त्याचा सर्वात जास्त मोबदला व्यापारी वर्गाना मिळतो. त्यामुळे आपण कितीही ओरडुन सांगितले की, आता शेतकऱ्यांना अच्छे दिन आले म्हणून. मात्र शेतकऱ्याचे बुरे दिन कधीच जात नाही. उलट टमाटर भाव वाढीमुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन आले असल्याने गृहिणीं टमाटर ची चांगलीच काटकसर करीत असल्याचे दिसून येत आहे. दर वेळी एक ते दीड किलो टमाटर घेणारी गृहिणी सध्या एक पाव , अर्धा किलो घेताना दिसत आहे.

error: Content is protected !!