Home राजकीय चंद्रपुर येथे आज शिवसेनेचा  कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा

चंद्रपुर येथे आज शिवसेनेचा  कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा

1371

 आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची उपस्थिती 

चंद्रपुर

.         राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांचे सुचनेनुसार शिवसेना सचिव आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत  मातोश्री मंगल कार्यालय, तुकूम चंद्रपूर येथे रविवारी शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे.

.         चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष बांधणीच्या दृष्टीने व विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश पक्ष प्रवेश करून घेण्याकरिता आमदार मनीषा कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येत आहे. सदर मेळाव्यास चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख गंगाधर बडूरे व दत्तात्रय पेतवार व शिवसेना उपनेत्या कला शिंदे हे प्रामुख्याने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे. या शिवसेना मेळाव्याकरिता जिल्ह्यातील तमाम आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतीनिधिनी तसेच महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख चंद्रपुर नितीन मत्ते, जिल्हा प्रमुख बंडू हजारे, जिल्हा प्रमुख महिला आघाडी  मिनल आत्राम, प्रतिमा ठाकूर, संघटिका चंद्रपूर योगिता लांडगे, महानगर प्रमुख चंद्रपूर भरत गुप्ता, तालुका प्रमुख चंद्रपूर संतोष पारखी, प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर आशिष ठेंगणे, जिल्हा अप्रमुख वैद्यकीय कक्ष अरविंद धिमण, जिल्हाप्रमुख विधी व न्याय विभाग अॅड. मधुकर फुलझेले यांनी केले आहे.

 

error: Content is protected !!