टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र फोडण्याचा प्रयत्न 

62

ग्रामपंचायतचा सीसीटीव्ही कॅमेरा, एलसीडी चोरट्यांनी पळविला 

गावकर्‍यांच्या सतर्कतेने चोरट्याचा डाव फसला

टेमूर्डा

.        येथील ग्रामपंचायत कार्यालयाला लागून असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा टेमुर्डा ची इमारत आहे. अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची खिडकी फोडली. त्यानंतर लागूनच असलेली बँकेची भिंत फोडून बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात चोरटे असफल झाल्याने ग्रामपंचायत मधील सीसीटीव्ही कॅमेरा, एलसीडी आणि डीव्हीआर चोरून नेत पळ ठोकला. गावकर्‍यांच्या सतर्कतेने बँक लुटण्याचा चोरट्याचा डाव फसला. ही घटना शुक्रवारी ८ डिसेंबर च्या  मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास घडली.

.        वरोरा तालुक्यातील टेमूर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र पुन्हा एकदा फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. परंतु गावकऱ्यांच्या सतरतेमुळे हा प्रयत्न फसला. दरम्यान चोरट्यांनी ग्रामपंचायत मधील सीसीटीव्ही कॅमेरा, एलसीडी आणि डीव्हीआर पळवला.  याप्रकरणी गुन्हा दाखल करून  पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. वरोरा तालुक्यातील टेमूर्डा येथे बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा आहे. या शाखेचे कार्यालय फोडण्याचा अनेकदा चोरट्यांनी प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळेस त्यांच्या हाती अपयश लागले. दरम्यान शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर रोजी  मध्यरात्री बाराच्या नंतर अज्ञात चोरट्यांनी बँकेला लागून असलेल्या ग्रामपंचायत च्या कार्यालयाची खिडकी फोडली आणि बँक व ग्रामपंचायत कार्यालय यांना लागून असलेली भिंत फोडून बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

.        परंतु याच वेळी बँकेपासून काही अंतरावर असलेल्या ठावरी यांच्या कुत्र्याने भुंकणे सुरू केले आणि ठावरी कुटुंब जागे झाले. तोडण्याचा आवाज ऐकून त्यांना बँक फोडीत असल्याचा संशय आल्याने त्यांनी लगेच पोलीस पाटील, ग्रामपंचायत मधील ऑपरेटर आणि इतर गावकऱ्यांना याची माहिती भ्रमणध्वनी वरून दिली. याबाबत माहिती मिळताच पोलीस पाटील पंढरी देवगडे यांनी लगेच पोलिसांना कळवले.

.        पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन याचवेळी घटनास्थळी पोहोचली.  आणि गावकरीही बँकेच्या दिशेने निघाले. दरम्यान आपला प्रयत्न असल्याचे लक्षात येतात आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने नागपूर मार्गावरील पेट्रोल पंप पर्यंत मार्ग दाखवला. परंतु त्यानंतरचा आरोपींचा मार्ग मिळू शकला नाही.  एलसीबीच्या दोन टीम आणि वरोरा गुन्हे शोध पथकाची एक टीम आरोपींचा शोध घेत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आज शनिवार दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सदर घटनेचा तपास वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तरवार  आणि त्यांची टीम करीत आहे.