Home सामाजिक विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जटपुरा गेट येथे पाणपोईचे उद्घाटन

विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जटपुरा गेट येथे पाणपोईचे उद्घाटन

1344

चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जोपासणारी एकमेव संस्था म्हणजेच विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जटपुरा गेट येथे दरवर्षी पाणपोई लावण्यात येते. एप्रिल महिन्यातच या कार्याला सुरुवात होत असते परंतु यावर्षी प्रथमच या कार्यास थोडासा विलंब झाला.

.       उन्हाळ्यात आपल्या चंद्रपूरचे तापमानचा पारा हा वाढलेलाच असतो. तरीसुद्धा आवश्यक कामाकरिता नागरिकांना घराच्या बाहेर पडावेच लागते अशा वेळेस येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरू करिता थंडगार पाण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून विठाई बहुउद्देशीय संस्था ही कार्य करीत असते. आज मातृदिनाचे औचित्य साधून विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वर्गीय लक्ष्मीबाई उद्धवराव नगराळे यांच्या स्मृति प्रित्यर्थ पाणपोईचे उद्घाटन विठाबाई लक्ष्मणराव काहीलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

.       यावेळेस संस्थेचे अध्यक्ष महेश कहिलकर, दिनेश जुमडे, सोनल धोपटे, ओमप्रकाश मिसार, कल्पक नगराळे, भारती कश्यप, प्रीतम रागीट, भारती जिराफे, माधुरी काहीलकर, शिवानी घटे, सीमा टेकाळे, सुषमा मोकळे, अर्चना मीसार, प्रीती मडावी, कीर्ती नगराळे, नीलिमा मेंडुलकर इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती. संतोष थिपे यांचे विशेष सहकार्य लाभले.

error: Content is protected !!