आनंद निकेतन विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या लघुलेखिका कालिंदी देशमाने  सेवानिवृत्त

43

वरोरा

.         महारोगी सेवा समिती व्दारा संचालित आनंद निकेतन विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या लघुलेखिका  कालिंदी देशमाने. या सलग ३७ वर्षे अशा प्रदिर्घ काळ लघुलेखक या पदावर सेवेत होत्या. त्या निमित्ताने सेवावृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. सर्वप्रथम “श्रद्धेय बाबा आमटे व साधना ताई आमटे” यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण दीपप्रज्वलन करण्यात आले.

.         या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मृणाल काळे,  सत्कारमूर्ती कालिंदी देशमाने, यशवंत देशमाने, प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य प्रा  राधा सवाने, मुख्य लिपिक देवानंद अलोने. व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ संजय साबळे. ३७ वर्षे कार्यसेवेची रुपरेषा कार्यक्रमाचे भुमिका स्पष्ट केले. महाविद्यालयाचे जेष्ठ कर्मचारी बाबा वटे आपले मनोगतात देशमाने यांच्या सलग तिस वर्षांचा आशय व सेवेचा कार्यपरिचय व्यक्त केले. तसेच महविद्यालयाचे उपप्राचार्य राधा सवाने. कालिंदी देशमाने यांनी ३७ वर्षांचा कार्यकाळ स्वअनुभव व्यक्त केले. कालिंदी देशमाने त्यांनी आपल्या मनोगतात श्रद्धेय बाबा व साधनाताई यांच्या समाजसेवेचा वसा महाविद्यालय व समाजाकरिता आम्ही आधी करत होतो व यापुढेही करत राहील असे प्रतिपादन व्यक्त केले.

.         वरिष्ठ लिपिक कमलाकर डुकरे. संकेत कायरकर यांनीही आपले अनुभव स्वरूपाने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ मृणाल काळे, देशमाने यांचे महाविद्यालयाच्या ३७ वर्ष सेवेत असताना महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीमध्ये खूप मोलाचा वाटा आहेत, विद्यापीठाचा शिक्षकेतर कर्मचारी महोत्सवात आमचे महाविद्यालयात सदैव प्रथम स्थानावर आघाडीवर आहेत याकरिता देशमाने यांचे खूप मोठ्या प्रमाणात महाविद्यालयतर्फे कौतुक केले. या सेवानिवृत्त कार्यक्रमांत विशेष म्हणजे सर्व देशमाने सहकुटुंब उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रयोगशाळा सहाय्यक हिना पांडे. तर आभार प्रदर्शन ग्रंथालय लिपिक सौ मनीषा मनगटे यांनी केले या कार्यक्रमात कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी तथा माजी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.