नागभीड
. येथील सम्यक पतसंस्थेच्या आमसभेत गोंधळात गोंधळ झाल्याने आमसभा संपवावी लागली. सहकार अधिनियम 1960 नुसार वर्षातून एकदा वार्षिक आमसभा घेतली जाते. तशीच आमसभा सम्यक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागभीड यांची ९ वी वार्षिक आमसभा रुक्मिणी सभागृहात रविवारला घेण्यात आली आमसभा संस्थाचालकांच्या अनेक वादग्रस्त कारणामुळे तहकूब करण्यात आली होती. तिचं सभा १ महिना ३ दिवसांनी त्याच जागी शुक्रवारला घेण्यात आली. सभा सुरू असताना भाग भांडवलदार/ सभासद अहवाल पुस्तिकेमध्ये व पतसंस्थेच्या कारभाराविषयी प्रश्न विचारत असताना अध्यक्षाकडून व व्यवस्थापकाकडून समाधानकारक उत्तरे न येत मिळाल्यामुळे अनेक भाग भांडवलदार नाराज होऊन त्यांनी आपली नाराजी व्यक्त करीत असताना अध्यक्ष व व्यवस्थापक यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न देता येत असल्यामुळे त्यांनी सभास्थळावरून पोबारा केला. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे भाग भांडवलधारकांना मिळाली नाही तसेच कुठल्याही प्रकारचे भाग भांडवलदारांच्या हिताचे ठराव घ्यायचे होते ते राहून गेले.
. अशा तऱ्हेने व्यवस्थापक अध्यक्ष व इतर संचालक मंडळांनी सहकार क्षेत्रातील नियम धाब्यावर बसवून सहकार अधिनियम 1960 कलम 75 ( 2 )चे सरळ सरळ उल्लंघन केले त्यामुळे अशा दोषी संस्थाचालक अध्यक्ष,व्यवस्थापक , संचालक मंडळाविरोधात संबंधित कार्यालयाने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाग भांडवलदारांकडून करण्यात येत आहे.
संस्थेचे अध्यक्ष यांनी कुठल्याही नियमाचे उल्लघन केले नसल्याचे सांगितले .ज्या ठिकाणी सभा घेण्यात आली ते हाल ५ वाजे पर्यंत खाली करायचे होते. विषय सुची नुसार सर्व विषयावर चर्चा झाली. काही भाग भांडवलदार यांनी विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तरे दिली. सभेमधुन कोणीही पळुन गेले नाही. श्याम रामटेके, अध्यक्ष


