Home शैक्षणिक विद्यार्थ्यांनो वाघाच्या भूमीत वाघासारखे खेळा

विद्यार्थ्यांनो वाघाच्या भूमीत वाघासारखे खेळा

1141

 पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे प्रतिपादन 

 राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे थाटात उदघाट्न

चंद्रपूर 

.           विद्यार्थ्यांनो,आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाघाच्या भूमीत आले.या भूमीत वाघासारखे आपल्या खेळाचे प्रदर्शन करा.मैदानी खेळाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करा.राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर झेप घ्या.आपल्या देशाचा नावलौकिक वाढवा, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

.           महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व चंद्रपूर जिल्हा क्रीडाधिकारी तथा चंद्रपूर जिल्हा अथेलिटिक्स अशोसियशन च्या वतीने बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल,विसापूर येथे राज्य स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २९ ऑक्टोबर ते १नोव्हेंबर दरम्यान आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेचे उदघाट्न पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

.           पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले,आजतागायत २0१८ पर्यंत आपल्या देशाने आंतरराष्ट्रीय आल्पम्पिक केवळ २८ पदक प्राप्त केले होते.आता ती उणीव भरून निघाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खेळाच्या मैदानावर क्रीडा पटू उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. देशाला आजघाडीला खेळाडूंच्या माध्यमातून क्रीडा प्रकारात पदके मिळत आहे. त्यामुळे देशपातळीवर नावलौकिक वाढत आहे. 2036 साली देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतील,त्यावेळी आपण पदक मिळविण्याचा आतापासून संकल्प करा.आपल्या जिल्ह्यात आगामी वर्षात डिसेंबर मध्ये राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जातील,असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितले.

.           यावेळी मंचावर वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेल,जिल्हाधिकारी विनयकुमार गौडा, जिल्हाक्रीडा अधिकारी अविनाश पुंड,परभणी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी जयंत टेम्भरे, जिल्हा क्रीडा सचिव सुरेश आडेपवार,बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप,पूनम नवघरे,प्राचार्य प्रशांत दोंतुलवार,नरिन्द्रसिंग दारी,समीर केने यांची उपस्तिथी होती. यावेळी मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कवायत व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना मोहित केले.

error: Content is protected !!