सिंदेवाही
. आपल्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गौतम बुद्धांनी भिक्खू संघाची निर्मिती करून तथागत बुद्ध भिक्खुना उद्देशून असे म्हणतात की, मी दैवी आणि मानवी बंधनातून मुक्त झालेलो आहे. वर्ण व्यवस्थारुपी मानवी सामाजिक गुलामी झुगारून दिलेली आहे. बहुजनांच्या कल्याणासाठी धम्माचा प्रसार करा. कारण धम्म हा विज्ञानवादी असून सर्वच मानवांचे कल्याण साधणारा आहे. असे मार्गदर्शन भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष डॉ.राजपाल खोब्रागडे यांनी वर्षावास प्रवचन मालिका समाप्ती कार्यक्रमात व्यक्त केले.
. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा सिंदेवाही अंतर्गत आश्विन पौर्णिमा पासून सुरू झालेला वर्षावास प्रवचन मालिका कार्यक्रम सतत तीन महिने सुरू असून कोजागिरी पौर्णिमेला वर्षावास प्रवचन मालिका समाप्ती झाली. त्यानिमित्ताने राजा बिंबीसार बुद्ध विहार कळमगाव ( गन्ना) येथे कोजागरी पोर्णिमेच्या दिवशी प्रवचन मालिका समाप्ती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. कीर्तनकार बाबुराव गेडाम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष ( पूर्व ) डॉ.राजपाल खोब्रागडे , बौद्ध पंच कमिटी अध्यक्ष गेंदबाजी खोब्रागडे, ग्राम पंचायत सदस्य कोमल गेडाम, महिला मंडळाच्या प्रेमीला खोब्रागडे, शिल्पा गोंडाने, रमा खोब्रागडे, इत्यादी मंचावर उपस्थित होते.
. यावेळी कीर्तनकार बाबुराव गेडाम यांनी बुद्धांचे विचार आत्मसात केल्याशिवाय मानवाची प्रगती शक्यच नाही. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालक तथा आभार सुरज खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमासाठी वॉर्डातील असंख्य उपासक उपसिका उपस्थित होते. कार्यक्रमानंतर खिरदान वाटप कार्यक्रम घेण्यात आला.


