Home चंद्रपुर जिल्हा विशेष मानोरा फाट्यावर सर्व्हिस रोड व स्पीड ब्रेकरची निर्मिती करा

मानोरा फाट्यावर सर्व्हिस रोड व स्पीड ब्रेकरची निर्मिती करा

219

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सा. बां. विभागाला निवेदन

अपघातांची मालिका रोखण्यासाठी जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांच्या नेतृत्वात मागणी

भद्रावती :  शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवेवरील मानोरा फाट्याजवळील हॉटेल जमघट परिसर अपघातांचे केंद्र बनला आहे. या ठिकाणी आजवर अनेक भीषण अपघात होऊन मोठी मनुष्यहानी झाली आहे. भविष्यातील हे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने हायवेलगत सर्व्हिस रोड तयार करून स्पीड ब्रेकर व झेब्रा क्रॉसिंगची निर्मिती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

.       या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. मानोरा फाट्यावरून चंदनखेडा व इतर गावांकडे जाणाऱ्या रस्त्याचा फाटा आहे. मात्र, या ठिकाणी हायवेला मोठे वळण असून सर्व्हिस रोड उपलब्ध नाही. परिणामी, भरधाव वेगातील वाहनांवरील ताबा सुटून अपघातांची मालिका सुरू आहे.

.       या मार्गावर शालेय विद्यार्थी आणि लहान-मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असते. सर्व्हिस रोडअभावी वाहनधारकांना थेट हायवेवरूनच प्रवास करावा लागतो, जो अत्यंत धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

.       निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार, रोहित साखरकर, दानिश शेख, विजय डोंगरे, असिफ शेख, प्रथम शेंडे, अकरारा शेख, नूतन लेडांगे यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!