विनापरवाना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कुणाडा शिवारात पहाटे २ वाजता केली कारवाई
भद्रावती : अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध भद्रावती महसूल विभागाने आपली मोहीम तीव्र केली आहे. आज दिनांक ७ मार्च २०२६ रोजी पहाटे २:४५ वाजताच्या सुमारास, माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज पथकाने मौजा कुणाडा जवळ सापळा रचून रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला.
. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज नंदी रा. फुकट नगर, भद्रावती यांच्या मालकीचा ट्रॅक्टर विनापरवाना रेतीची वाहतूक करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथक प्रमुख अनिल दडमल (मंडळ अधिकारी) यांच्यासह खुशाल तुरारे, राहुल भोंगळे, संदीप मुरकुटे (ग्राम महसूल अधिकारी) आणि बंडू वेलफुलवार यांनी या वाहनावर जप्तीची कारवाई केली.
. सदर जप्त केलेला ट्रॅक्टर पुढील दंडात्मक आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


