पाण्याच्या सहाय्याने मूर्तींची सफाई
ज्ञानेश्वर डुकरे व शिवसैनिकांचा पुढाकार
भद्रावती : स्थानिक भद्रनाग मंदिर चौकातील बुद्ध लेणी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना नगरपरिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘स्वराज्याची शपथ’ सोहळा आणि बुद्धकालीन देखाव्यांची आज शिवजयंतीच्या पर्वावर स्वच्छता करण्यात आली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी हा संपूर्ण परिसर पाण्याने स्वच्छ करून एक आदर्श पायंडा घालून दिला.
![]()
. शहरात आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित शोभायात्रेपूर्वी सकाळीच ज्ञानेश्वर डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक भद्रनाग मंदिर चौकात एकवटले. त्यांनी अत्यंत श्रद्धेने स्वराज्याची शपथ घेणाऱ्या मूर्ती आणि बुद्धकालीन देखाव्यांची पाण्याने स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेत माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, दिलीप पारखी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. शिवरायांच्या विचारांचा वारसा जपत, केवळ उत्सव न साजरा करता परिसराची निगा राखून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.


