Home चंद्रपुर जिल्हा विशेष कोरपना व जिवती शहरात राष्ट्रीयकृत बँकेचा अभाव

कोरपना व जिवती शहरात राष्ट्रीयकृत बँकेचा अभाव

915

खातेदारांची गैरसोय

अनेक बाबीसाठी खाते अनिवार्य

कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व जिवती या दोनच तालुका मुख्यालयी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा नाही. त्यामुळे शहरातील नागरिक, व्यापारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या दृष्टीने राष्ट्रीयकृत बँकेची शाखा त्वरित स्थापन करण्यात यावी अशी मागणी होते आहे.

.      कोरपना व जिवती तालुक्याच्या निर्मितीनंतर येथे अनेक शासकीय निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, विविध उद्योगधंदे स्थापित झाल्याने दोन्ही शहराचा नगर विस्तार झपाट्याने होत चालला आहे. शिवाय लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरपना येथून चंद्रपूर आदीलाबाद राष्ट्रीय महामार्ग, वणी राज्य महामार्ग व इतर रस्ते जोडले आहे. तर जिवती येथून भोयगाव – परमडोली राज्य महामार्ग, आदिलाबाद, आसिफाबाद सह अनेक मार्ग जोडले आहे. त्यामुळे येथे चोवीस तास वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. यातच बँकिंग व्यवहार येथील वाढले आहे. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक, विदर्भ कोकण बँक व इतर पतसंस्था व्यतिरिक्त एकही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा दोन्ही तालुका मुख्यालय असलेल्या शहरात नाही. त्यामुळे अन्यत्र ठिकाणी असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतून आपले आर्थिक व्यवहार करावे लागते आहे. खातेदारांची होणारी गैरसोय लक्षात घेता दोन्ही स्थानी नव्या शाखा स्थापन कराव्या अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या अनुषंगाने लोकप्रतिनिधी व प्रशासन ने लक्ष देणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा                                                                                                                                           कोरपना तालुक्यात वनसडी, उपरवाही येथे बँक ऑफ इंडिया, गडचांदूर, कवठाळा, लखमापूर, आवरपूर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया तर गडचांदूर येथेच एक नव्याने बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा उघडण्यात आली आहे.अशा संपूर्ण सात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा आहे. तर जिवती तालुक्यात पाटण येथे भारतीय स्टेट बँकेची एक शाखा आहे. परंतु दोन्ही तालुका मुख्यालयावर एकही तालुका निर्मितीचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही हीच मोठी शोकांतिका आहे.

error: Content is protected !!