Home चंद्रपुर जिल्हा विशेष बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

916

मोटेगाव येथील घटना

नेरी : गोठ्यात बांधलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून तीन शेळयांना ठार केल्याची घटना चिमुर तालुक्यातील मोटेगाव येथे घडली.

.     मोटेगाव येथील गजानन ठाकरे यांचे घराला लागून शेळ्यांचा गोठा आहे. मध्यरात्री बिबट्याने गावात प्रवेश करीत गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करीत तीन शेळयांना ठार केले. रात्री शेळ्या ओरडण्याचा आवाज गजानन ठाकरे यांना आला त्यांनी गोठ्याकडे बघितले असता बिबट्या गोठ्यातील शेळ्यांवर ताव मारत असल्याचे दिसताच गजाननने आरडाओरडा केला. असता बिबट्या पळून गेला. मात्र तोपर्यन्त तीनही शेळ्याना बिबट्याने जागेवरच ठार केले होते सदर मोटेगाव परिसरात बिबट्याचे नियमित वावर असून या अगोदरही त्या बिबट्याने अनेक शेळ्याचा फडशा पाडला असून खूप मोठे नुकसान केले आहे तेव्हा सदर बिबट्याचे बंदोबस्त वनविभागाने करावा आणि शेळी मालकाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

.      सदरप्रकरणी माहिती मिळताच वनविभागाचे क्षेत्रसहायक अधिकारी रासेकर व वनरक्षक पाटील घटनास्थळी दाखल झाले तात्काळ मृत बकऱ्यांचा पंचनामा करून अहवाल वनविभागाला सुपूर्द केला. सदर घटनेमुळे शेळी मालकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्याच्यावर अस्मानी संकट कोसळले असल्याने त्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!