Home विशेष केंद्र सरकार विरोधात आशा गट प्रवर्तक लढा तीव्र करणार – कॉ. विनोद...

केंद्र सरकार विरोधात आशा गट प्रवर्तक लढा तीव्र करणार – कॉ. विनोद झोडगे

895

ब्रम्हपुरी : महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटकचे तिसरे राज्य अधिवेशन 27 व 28 एप्रिल गोंदिया येथे पार पडले. पहिल्या दिवशी शहरातून विराट रॅली काढून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांच्या समस्या बाबतीत सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आले.प्रतिनिधी सत्रात दुसऱ्या दिवशी  आयटक राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे  यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकार आशा गट प्रवर्तक मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. गट प्रवर्तक कंत्राटी कर्मचारी प्रस्ताव केंद्र सरकार कडे आहे. 2018 पासून आशा गट प्रवर्तक ना मोबदला दिलेला नाही. कामगार विरोधी श्रम संहिता तयार करून कामगार हित कायदे मोडून काडले जात आहेत. या विरोधात तीव्र लढा उभारण्याची गरज आहे. येत्या 20 मे 2025 देशव्यापी संप आयटक सह केंद्रीय कामगार संघटना नी पुकारला आहे तो यशस्वी करावा. आशा गट प्रवर्तक संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.

.       राज्य अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 27 प्रतिनिधी आशा गट प्रवर्तकांनी राजकिय व संघटना अहवाल वर  चर्चा केली. अधिवेशनात राज्य पदाधिकारी व राज्य कौन्सिल निवड करण्यात आली. यावेळी आशा गट प्रवर्तक संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी राजू देसले तर सरचिटणीस पदी मंदा डोंगरे व कार्याध्यक्षपदी वैशाली खंदारे यांची अधिवेशनात निवड करण्यात आली.

error: Content is protected !!