काँग्रेस नेते वसंत मुंडे यांची मुख्य सचिवांकडे मागणी
महागाईविरोधात राज्यभर काँग्रेसचे तीव्र आंदोलन
त्रिमूर्ती सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका
मुंबई : आरएसएस (RSS) विचारधारेच्या भाजपप्रणीत केंद्र आणि राज्यातील त्रिमूर्ती सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि घरगुती गॅसच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या अनियंत्रित दरवाढीमुळे बाजारात प्रचंड इंधन टंचाई निर्माण झाली असून, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि मध्यमवर्गीय जनतेचे जगणे असह्य झाले आहे. वाढत्या महागाईमुळे जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.
. या अन्यायकारक इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने आक्रमक आंदोलने केली जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने या जनभावनेची दखल घेऊन तत्काळ दरवाढ रद्द करण्याचे आदेश काढावेत आणि सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी जाहीर मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.
. या संदर्भातील मागण्यांचे एक सविस्तर निवेदन वसंत मुंडे, सुरेश पाटील खेडे, प्रकाश जाधव, कुंदा सोनवणे आणि शरद सोनवणे आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना सादर केले आहे. सरकारने यावर तात्काळ पावले न उचलल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.


