Home चंद्रपुर जिल्हा विशेष मानोरा येथील उपसरपंचावर अविश्वास पारित

मानोरा येथील उपसरपंचावर अविश्वास पारित

902

बल्लारपूर तालुक्यात भाजपातील अंर्तकलह चव्हाट्यावर

सरपंच पदाचे आरक्षण होताच घडामोड

बल्लारपूर : तालुक्यात मानोरा येथे ९ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. मागील सार्वत्रिक निवडणूक दरम्यान भाजपाचे ९ पैकी ७ सदस्य निवडून आले. कांग्रेस व शिवसेना प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले होते. त्यामुळे मानोरा ग्रामपंचायत मध्ये भाजपाच्या सरपंच जीवनकला ढोंगे व उपसरपंच पदी लहू टिकले निवडून आले. मात्र गावात राजकीय घडामोडीत ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच लहू टिकले यांचे अविश्वास प्रस्ताव दाखल करून ८ विरूध्द १ मतांनी पारित त्यांची उचलबांगडी केली.गावातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच ही घडामोड घडली. यामुळे बल्लारपूर तालुक्यात भाजपातील अंर्तकलह चव्हाट्यावर आला आहे.

.      बल्लारपूर तालुक्यात मानोरा गाव भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. तत्कालीन भाजपाचे तालुका सरचिटणीस रमेश पिपरे यांनी गावात भाजपाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात मागील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक लढली. भाजपाने निर्विवाद यश प्राप्त केले. सरपंच व उपसरपंच केले. मात्र भाजपातील अंर्तकलह चव्हाट्यावर येवून उपसरपंच लहू टिकले यांना ग्रामपंचायत मुदत संपण्याच्या पाच महिने अगोदर अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचेवर शासकीय कामकाजात अडथळा आणने,सदस्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याबाबत दमदाटी करणे व मासिक सभेत असभ्य वर्तन करण्याचा आरोप करून पाय उतार करण्यात आले.

.      मानोरा येथील उपसरपंच लहू टिकले यांच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा पिठासीन अधिकारी बल्लारपूर चे प्रभारी तहसिलदार महेंद्र फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ग्राम अधिकारी सुष्मा नंदेश्वर, सरपंच जीवनकला ढोंगे व अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी ८ विरूध्द १ मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. यामुळे उपसरपंच लहू टिकले यांचेवर पाय उतार होण्याची नामुष्की ओढवली.

error: Content is protected !!