जनावरांचे वैरण, शेतीचे अवजारे आगीत स्वाह
3 लाखाचे नुकसान
वरोरा : तालुक्यातील पिजदुरा शेत शिवरातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्याला मंगळवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरांचा चारा, शेतीची अवजारे व स्प्रिंकलर संच जळून खाक झाले यात अंदाजे 3 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
. वरोरा तालुक्यातील पिजदुरा येथील तीन शेतकऱ्यांनी शेतातच तात्पुरते जनावरांसाठी गोठे बांधले. या गोठ्यात जनावरांसोबत जनावरांचा चारा, शेती उपयोगी साहित्य, स्प्रिंकलर सेट ठेवल्या गेले होते. तर गोठ्यातील जनावरे सकाळी चराई साठी सोडण्यात आले होते. मंगळवारी अचानक गोठ्याला आग लागली यात पांडुरंग रंधीये यांचे जनावरचे वैरण चारा पूर्ण आणि शेतीचे अवजारे, काड्या जळून खाक झाल्या त्यांचे जवळ पास एक लाख रुपये चे नुकसान झाले तर जगदीश पावडे.यांचा जनावराचे चारा जळाल्याने 70 हजार रुपयाचे नुकसान झाले तर विजय पावडे यांचे स्पिंकर पाईप, शेतीचे अवजार इत्यादी साहित्य जळल्याने त्यांचे 1 लाख 20 हजार रुपयाचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती होताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने आग विजवण्यासाठी जी एम आर कंपनी आणि नगरपरिषद येथील अग्निशामक यांना पाचारण करण्यात आले. यांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.
. आगीची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ पोहचले व घटना स्थळावर संबंधित गाव तलाठी, व्हायरमन, पोलीस पाटील आणि सरपंच यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही साठी तहसीलदार वरोरा यांना माहिती देण्यात आली.


