Home चंद्रपुर जिल्हा विशेष दुचाकीचा अपघात : तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

दुचाकीचा अपघात : तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

971

गडचांदूर : गडचांदूरवरून राजुराकडे जात असताना दुचाकी दुभाजकावर धडकून तरूण – तरूणी खाली पडली आणि त्याच मार्गाने मागावून येत असलेल्या ट्रक खाली चिरडल्या गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना (दि. 15) ला मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली.

.        प्राप्त माहितीनुसार गडचांदूर -राजुरा मार्गावरील होली फॅमिली कॉन्व्हेन्ट ट्रनिंगवर सकाळी अंदाजे 11 च्या सुमारास अनूज भोयर (26)आणि प्रणाली पुसाम (22) दोघेही रा. पाटण (बेला) हे दोघेही मोटारसायकल ने काही कामानिमित्त राजुराकडे जात असताना. गडचांदूर शहरातील होली फॅमिली पब्लिक स्कूल जवडील डिव्हायडरला दुचाकी धडकली आणि मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. त्यात दोघेही जागीच गतप्राण झाले.

.         घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दोघांचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेची वार्ता पोहोचताच कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला, गावात शोककळा पसरली आहे. ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करत आहेत.

error: Content is protected !!