Home चंद्रपुर जिल्हा विशेष 4 लाखांची लाच घेताना जिल्हा परिषदेचा कार्यकारी अभियंता अडकला

4 लाखांची लाच घेताना जिल्हा परिषदेचा कार्यकारी अभियंता अडकला

950

चंद्रपूर : “जल जीवन मिशन” कार्यक्रम अंतर्गत केलेल्या कामाची बिले काढून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ सहाय्यक सुशील मारुती गुंडावार आणि परिचर मतीन फारुख शेख यांनी चार लाख रुपयाची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरा, वरिष्ठ सहाय्यक सुशील मारुती गुंडावार आणि परिचर मतीन फारुख शेख यांच्याविरुद्ध ४ लाख २० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.        मौजा जिवती येथील तक्रारदार यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी नुसार त्यांचे “जल जीवन मिशन” कार्यक्रम अंतर्गत जिवती आणि राजुरा तालुका येथील एकूण २३ गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामांपैकी १० गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते. त्यापैकी ५ गावांचे कामांचे एकुण ४३ लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले.

.      सदर काढुन दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी स्वतः करीता ४ लाख रूपयेची मागणी करून सदर रक्कम त्यांचे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांचेकडे देण्यास सांगीतले. तसेच वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी स्वतः करीता २० हजार रूपयेची मागणी केली. असे दोघांचे मिळून एकुन ४ लाख २० हजार रूपये लाचेची मागणी केली.

.      तक्रारदार यांची कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना ४ लाख २० हजार रुपये लाच देण्याची ईच्छा नसल्याने बोहरे व सुशील गुंडावार, यांचे विरुध्द लाच लुचपत कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे हर्ष बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना ४ लाख २० हजार रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली.

तीन दिवसाची पोलीस कोठडी                                                                                                                                                           जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा येाजनांच्या कामांचे बिले काढण्यासाठी 4 लाख 20 हजारांची लाच मागितली होती. ही लाचेची रक्‍कम घेताना अटक करण्यात आलेले चंद्रपूर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक व एका कंत्राटी परिचराला लाचलुचपत विभागाने आज शुक्रवारी न्यायायात हजर केले. न्यायालयाने तिघांनाही 3 दिवसाची 13 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कार्यकारी अभियंत्याला अटक केल्यानंतर त्यांच्या घरी केलेल्‍या चौकशीत 7 लाख 99 हजार 510 रूपयाची रोकड सापडली आहे. लाचलुचपत विभाग पुन्हा 3 दिवस या लाच प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.

error: Content is protected !!